घरात जर कासव असेल तर ही चूक करू नका, नाहीतर पैसा घराबाहेर जाईल. - Marathi Adda

घरात जर कासव असेल तर ही चूक करू नका, नाहीतर पैसा घराबाहेर जाईल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनेक लोक धनप्राप्ती साठी पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात. काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही जण धातूचं मित्रांनो कासव कोणते असू द्या.

ते आपल्या घरात धन संपत्ती लक्ष्मी खेचून आणत परंतु या कासवांच्या बाबतीत काही नियम पाळणे. मात्र अत्यंत आवश्यक आहे. जर आपण हे नियम पाळले नाहीत, तर हे कासव आपल्या घरात पैसा खेचून आनण्याऐवजी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकत आणि यामुळे आपल्या घरात महा दारिद्र येऊ शकत गरीबी येऊ शकते.

त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे फक्त आपण याच प्रकारचे कासव खरेदी करा आणि याच आपल्या घरात या दिशेला ठेवा. तस तर कासव हा शांत मंद गतीने चालणारा एक दीर्घायुषी जीव आहे.

कासव अनेक वर्ष जगतो आणि ज्या घरात कासव असते तिथलं वातावरण हे मंगलमय पवित्र बनतं. त्या ठिकाणी शुभदा निर्माण होते. फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठी नव्हे, तर ज्या ठिकाणी कासव असते.

त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्या घरात अशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या घरातील सदस्य खूप कमी वेळा आजारी पडतात आणि त्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. निरोगी राहतात.

फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठीच नव्हे जर त्या घरात कासव मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा येते आणि या सकारात्मक ऊर्जा मुळेच आरोग्य चांगले राहते. घरातील आजारपण दूर होते.

कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं देवघर असू शकता किंवा आपल्या हॉलमध्ये सुद्धा आपण हे कासव ठेवू शकतो. परंतु बाथरूमच्या शेजारी किंवा जी भिंत बाथरूमला लागू असेल किंवा बेडरूममध्ये सुद्धा आपण हे कासव चुकूनही ठेवू नये.

बाजारात अनेक प्रकारचे कासव मिळतं जर सप्तधातुचा कासव तुम्हाला मिळालं तर अति उत्तम स्पटिका पासून बनलेले किंवा काचेचे कासव सुद्धा आजकाल बाजारात मिळतं. परंतु पैसा खेचून आणण्यासाठी तांब्याच्या धातूपासून बनवले, कासव हे अति उत्तम मानलं जातं.

जेव्हा हे कासव तुम्ही खरेदी करून घरात आणाल तेव्हा त्या कासवाला जलाने अभिषेक घालायचा आहे. जर पंचामृत असेल तर अति उत्तम तुम्ही त्यानेसुद्धा कासवाला अभिषेक घालू शकता.

कासवाला एवढं महत्त्व का आहे, कारण कासव हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि कासव हे विष्णूचे एक रूप आहे. जेव्हा समुद्र मंथन झाले या मंथनाच्या वेळी चौदा रत्ने बाहेर पडली आणि त्यामध्ये अमृत कलश देखील होता आणि समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती कासव ही श्रीविष्णूची दुसरे अवतार आणि अशा पवित्र कासवाला घरात आणल्यानंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे.अभिषेक झाल्यानंतर चंदन कुंकू याने त्याची पूजा करायची आहे.

आता कासव ठेवायचं कुठे तर मित्रांनो अनेक लोक कासव घरात आणून ते अगदी कुठेही ठेवून देतात. खिडकीच्या शेजारी अगदी कुठेही ते कासव ठेवून देतात आणि तर मित्रांनो असं करू नका.

जेव्हा तुम्ही हे कासव ठेवाल, तेव्हा त्यासाठी एका प्लेटचा वापर करा. एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही हे कासव ठेवा आणि त्यामध्ये इतकं पाणी टाका ते कासव व्यवस्थितपणे त्यात बुडवलं पाहिजे.

जास्त नाही परंतु कमीत कमी कासवाचे पाय तरीक पाण्यात बुडले असले पाहिजे आणि मित्रांनो हे पाणी दररोज बदलायचा आहे आणि याच बरोबर काही लोक एक चूक वारंवार करतात ती म्हणजे कासवाची जागा ही काही काही दिवसांनी ते बदलत राहतात.

कासवाची जागा वारंवार बदलल्याने लक्ष्मी सुद्धा स्वतःचे स्थान परिवर्तन करते..तर हे तुम्ही चुकूनही करू नका. एकदा आपण घरात कासव आणले की, ते एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते त्याच ठिकाणी ठेवावे .

ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये. तुम्ही जर एकाच उत्तर दिशेला ठेवले तर त्याचं खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. हे शक्य नसल्यास ईशान्य कोपरा देखील तुम्ही हे कासव ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला सुद्धा हे कासव तुम्ही ठेवू शकता.

परंतु नैऋत्य दिशेमध्ये म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये हे कासव चुकूनही ठेवू नका यामुळे पैसा येत तर नाही परंतु आपल्या घरात असलेला पैसा हा बाहेर निघून जातो.

अनेक लोक कासव हे देवघरात ठेवतात. पण तरीही त्याचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही तर यासाठी देवघर सुद्धा योग्य दिशेत असणं खूप महत्त्वाचं आहे.

देवघर जर योग्य दिशेत असेल आणि या देवघरात कासव ठेवलं तर याचा शुभ परिणाम तुम्हाला 100% दिसून येईल. जर हे कासव तुमच्या घरातील नैऋत्य कोपर्‍यात असेल तर लगेच तिथून काढून टाका.

आणि योग्य दिशेला ठेवा नैऋत्य दिशेस असणारे कासव हे अत्यंत अशुभ फळ देत असते. कासवाचा मुख हे कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कासवाची दृष्टी ही आपल्या घरात पडली पाहिजे.

फक्त घरातच नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानात सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता. तुमचा जिथे गल्ला असेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेण्यासाठी बसता त्या ठिकाणी तुमचे उजव्या बाजूला कासव येईल अशा ठिकाणी हे कासव ठेवा.

जर कोणाच्या घरात जिवंत कासव असेल तर त्याची योग्य ती आपण निगा राखली पाहिजे. तो जिवंत प्राणी आहे जर त्याची आपण व्यवस्थित निगा राखली नाही तर त्याचे अशुभ फळ देखील आपल्याला मिळू शकते,

त्यामुळे शक्यतो धातूचे कासव घरात ठेवावे. जर आपण घरात धातूचे कासव ठेवले तर त्याची पूजा करणे सोपे जाईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!