कुंभ राशी, बुधाच्या गोचराने होणार विपरीत परिणाम..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  कुंभ राशी, बुधाच्या गोचराने होणार विपरीत परिणाम..

कुंभ ही राशीचक्रातील 11वी रास असून या राशीच बोधचिन्ह म्हणजे उभा असलेला पुरुष, ज्याच्या खांद्यावर पाण्याने परिपूर्ण भरलेला घडा आहे. घडा पूर्ण भरून पाणी ओसंडून वाहत आहेत,

याचा अर्थ ज्ञानाने परिपूर्ण असलेले व्यक्तिमत्व. मात्र ते ज्ञान स्वतःपुरत्या मर्यादित नसून इतरांसाठी सुद्धा आहे, असा याचा अर्थ होतो. कुंभ रास ही अध्यात्माने परिपूर्ण असून या ज्ञानाने ही परिपूर्ण रास आहे.

आपल्यातील ज्ञान इतरांना वाटनं, समाजातील लोकांना सुद्धा ज्ञानी बनवणं हा त्यांचा स्वभाव असतो. समोरील व्यक्ती अगदी तळागाळातल्या असली तरीसुद्धा ही लोकं त्यांनाही ज्ञान देतात.

मुळात ज्ञान देण्याची उपजत बुद्धी या राशीच्या लोकांमध्ये असते. आपल्या कामाला देव मानणारी या राशीची लोक असतात. धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ही नक्षत्र या राशीमध्ये येतात.

या राशीचा स्वामी सुद्धा शनी ग्रह आहे. वायुत्वाची रास असल्यामुळे अत्यंत हुशार, अभ्यासू आणि कष्टाळू अशी ही रास आहे.

या राशीच्या व्यक्ती कोणत्याही कामाला लाजत नाहीत. कोणत्याही कामात बेधडक हात घालणारी अशी ही रास आहे. शनी ग्रहाच्या अमलाखाली ही रास येत असल्यामुळे भविष्यातील कोणत्याही कामाचं

किंवा पैशांचं नियोजन करण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे सल्लागार, नियोजनकार या भूमिकेत हे लोक परफेक्ट बसतात. शास्त्रीय संशोधन करणं, नवनवीन गोष्टींचा अभ्यास करणं, विशेषता विज्ञानाचा या राशीच्या लोकांना खूप आवडत.

जर या महिन्यात जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर अचानक त्यात काही अडचणी येऊ शकतात आणि नियोजन बिघडू शकते.

तुम्हाला काही घरगुती कामासाठी बाहेर जावं लागेल, पण त्यातही अडचणी येतील. कुटुंबातील सर्वांमध्ये परस्पर प्रेम राहील आणि नातं अधिक घट्ट होईल. या काळात तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होऊ शकते.

तुमच्याकडून त्यांना मदत अपेक्षित असेल, पण तुम्ही ती करू शकणार नाही, अशा वेळी कोणती गोष्ट थेट नाकारण्याऐवजी परिस्थितीनुसार निर्णय घ्या.

याचबरोबर, आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी संतुलित आहे. जर तुम्ही कर्जासाठी कुठेतरी अर्ज केला असेल तर तो अर्ज पास होऊ शकतो. पण जर पैसे कुठे गुंतवले असतील तर तिथे मात्र अडचणी निर्माण होतील.

व्यवसायात फायदा होईल पण त्याचबरोबर खर्चही वाढेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्यात अडचणी येतील आणि तुमचा नोकरीबाबत भ्रमनिरास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या सर्वाधिक लक्ष नवीन नोकरीच्या शोधात असेच.

सरकारी अधिकारीही स्वतःसाठी काही नवीन काम शोधतील, जेणेकरून काही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमुळे असाल तर या महिन्यात निरसपणा जाणवू शकतो,

नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही कोणा त्रयस्थकडून केला आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.

लग्नाला 5 वर्षाहून अधिक काळ लोटला असेल तर तुम्ही या महिन्यात दोघही भविष्यातील रणनीती बद्दल चर्चा कराल.

दोघांमध्ये फलदायी संवाद होईल. जर तुम्हाला मुलाचे सुख मिळाले नसेल तर या काळात आनंदाची बातमी मिळू शकते. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दातांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

त्यामुळे काही व्यवस्था आधीच करून ठेवा. जर बीपीची समस्या असेल तर नियमित तपासणी करून घ्यावे, जेणेकरून नंतर त्रास होणार नाही.

तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही जाणवेल आणि शरीरात उर्जा राहील. मन शांत राहील आणि नवीन कल्पनांचा समावेश होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!