नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात अनेक धार्मिक विधी आणि परंपरा आहेत. आणि आज ही सर्व हिंदू त्या विधी परंपराचे पालन करीत आलेले आहे.हिंदू धर्मात स्त्रिया प्राचीन काळापासून एक विधीचे पालन करीत आलेल्या आहेत, ते म्हणजे कपाळावर कुंकू लावणे
हिंदू धर्मात कुंकूला खूप महत्त्व आहे. कारण प्रत्येक शुभकार्यात कुंकूचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यातील कुंकूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिने कपाळावर लावलेले कूंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळख, सौभाग्याचं देणं मानले जाते.
सौभाग्याचे आयुष्य भरपूर राहावे, यासाठी महिला कपाळावर कुंकू लावतात. विवाहित स्त्रीच्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख समृद्धीचा ओळख करून देते.
हिंदू समाजामध्ये भांग भरण्याचा अधिकार फक्त स्त्रीला लग्नानंतरच प्राप्त होत असतो. त्यामध्ये लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पतीने आपल्या पत्नीच्या भांगत कुंकु भरत असतो. म्हणून स्त्रीच्या जीवनात कुंकूचे खूप महत्त्व आहे.
भांग भरलेली स्त्रीत असल्यास त्याच्या विवाहित असण्याचे हे प्रमाण आहे. एका विवाहित स्त्रीसाठी सर्व सोळा शृंगारमध्ये कुंकू अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक महिला कपाळभर कुंकू लावतात.
मात्र आता या कुंकाची जागा टिकलीने घेतली असली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. याशिवाय हिंदु धर्मात प्रत्येक सण, उत्सव घरगुती कार्यक्रमात अजूनही कुंकूचाच वापर आजही केला जातो.
पण हा कुंकू वापरत असताना किंवा वैवाहिक महिलांच्या माथ्यावर लावताना काही काळजी घ्यावी कोणती काळजी घ्यावी हे हिन्दू शास्त्रत सांगितले आहे.हिंदु धर्मात वैवाहिक स्त्रीने भांगात कुंकू भरणे,अत्यंत शुभ असते.
पण त्या महिलेने कधीच सर्वांसमोर भांग भरू नये.कायम आपली खोलीत एकटे असताना कुंकू भांगात भरावे, याशिवाय आपली कुंकूवाची डबी इतरांबरोबर शेअर करू नये.
तसेच वैवाहिक स्त्रीया त्याचा भांग किंवा माथ्यावर कुंकू लावताना कोरडे कुंकू किंवा सिंधूर पेन्सिलचा अशा वस्तूंचा वापर करतो असतात ,परंतु कोरड कुंकु भांगत भरणे अत्यंत शुभ मानले जाते.
तसेच जर कुंकु लावताना थोडेसे आपली नाकावर किंवा चेहऱ्यावर पडले तर ते खूपच शुभ मानले जाते.कारण नाकावर कुंकू पडणे याचा अर्थ पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे.
कुंकु नेहमी लहान मुलाच्यापासून लांब ठेवावे. परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकु जमिनीवर पडले तर आधी त्याला नमस्कार करून, थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे.
राहिलेले जास्त खराब झालेले कुंकु कोणाच्या पायाखाली येणार नाही ,असा ठिकाणी टाकावे.
वैवाहिक महिलेने आंघोळीपूर्वी कधीच भांग भरू नये.याशिवाय अनेक स्त्रियांना एका बाजूला तिरपे कुंकू लावण्याची सवय असते, त्यामुळे तिचा पतीही तिच्यापासून बाजूला होत असतो,असे सांगितले जाते.
यासह जी स्त्री भांग भरून , केसांच्यामध्ये झाकून ठेवते, तिचा पती समाजापासून अलिप्त होतो आणि एकटा पडत असतो.त्यामुळे सिंदूर नाकाच्या सरळ रेषेवर लावा व ते इतरांना दिसेल ,अशा पद्धतीने लावावे पाहिजे.
कोरडा कुंकू हा नेहमी आपल्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. कुंकू देवी-देवतांना अर्पण केली जाते व त्या स्त्रीलाही वापरण्यासाठी दिले जाते,म्हणजे तिला देवी इतकाच मान दिला जातो.
तसेच वैवाहिक स्त्री याच्या सौंदर्यातही भर टाकण्याचे काम सिंधूर करत असते. कुंकू नेहमी चांगल्या दर्जाचे लावावे नाही तर त्यापासून आपल्या त्वचेला हानी होऊ शकते .
हे सिंधूर किमान एका आठवड्यातून दोन दिवस तरी आवश्य लावावे. तुम्ही दिवसातून कमीत कमी वेळात आपला भांग भरू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.