नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा येत्या 16 ऑक्टोबरला साजरी केली जामार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे.
यामुळे चार राशींचे नशीब चमकणार आहे. याशिवाय देवी लक्ष्मीचे आशीर्वादही मिळणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता. त्यामुळेच, उत्तरेकडील काही भागांत याला रास पौर्णिमा असं देखील म्हणतात.
शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. ज्याला कोजागर पौर्णिमा असं देखील म्हणतात.यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवि योग जुळून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवि योग सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी होणार आहे.
हा योग संध्याकाळी 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी ध्रूव योग सकाळी 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे.
येत्या काळात सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, सूर्य आणि केतू कन्या राशीत आहेत अशी भविष्यातील ग्रहांची स्थिती आहे. 17 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे तो बुधशी जोडेल.
शुक्र वृश्चिक राशीत, प्लूटो मकर राशीत आणि शनि कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.या आगामी काळात चंद्र मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीत भ्रमण करेल. मंगळवारी प्रदोष, बुधवारी कोजागरी पौर्णिमा. गुरुवारपासून कार्तिक स्नानाला सुरुवात होणार आहे.
रविवारपासून पंचक सुरू झाली आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीनही दिवस पंचक असून गुरुवारी पंचक दुपारी ४:०० ते २०:०० वाजेपर्यंत असेल.तूळ राशीतील सूर्याच्या संक्रमणास तूळ संक्रांत म्हणतात. यासोबतच बुधादित्य योगही बुधासोबत येत आहे. त्यामुळे कोजागरी पौर्णिमा हा शुभ योग असल्याचे बोलले जात आहे.
मेष राशी: मेष राशीच्या व्यक्तींना धनलाभ.मेष राशीमधील व्यक्तींचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळणार आहे. याशिवाय आधी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होणार आहे.कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवे काम सुरु करण्यासाठी योग्य दिवसही आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहिल.
देवी लक्ष्मीची कृपा होईल आणि घरात सुख-समृद्धी येईल,हा काळ सकारात्मक आणि उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि व्यवसायात अपेक्षित नफा देखील होऊ शकतो.
उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. एकूणच आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील. गुप्त शत्रू आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तुम्हाला बारीक नजर ठेवावी लागेल.
कुटुंबातील आई-वडील आणि भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. भौतिक सुखसोयींशी संबंधित काही मोठी वस्तू खरेदी करू शकता.
सिंह राशी : सिंह राशीच्या व्यक्तींना मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायात मोठी डील होऊ शकते. यामुळे भविष्यात फायदा होईल. परिवार आणि समाजात लोकप्रियता वाढली जाईल. कोणताही प्रवास सुखकर होईल.
तुळ राशी : व्यक्तींना मिळणार नोकरी. तुळ राशीच्या व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अडकलेली कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. एखाद्याचे तुमच्यावर कर्ज असल्यास ते फिटले जाईल. पार्टनरशिपच्या व्यवसायात लाभ होईल. गुंतवणूकीसाठी उत्तम वेळ आहे.
कुंभ राशी :कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारले जाईल. एखादे नवे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. सासरच्या मंडळींकडून गोड बातमी कळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून त्यांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे.
अविवाहितांसाठी देखील उत्तम काळ आहे. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवता येतील. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रियकराशी जवळीक वाढेल. कदाचित एखादी मैत्रीण भेटवस्तू देऊ शकते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.