नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात.
या दिवशी जे व्रत पाळले जाते त्यास कोजाव्रत’, असे म्हटले जाते. या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. पूजेनंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
नैव्यद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवैद्य आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावा, असे या व्रताच्या विधीमध्ये म्हटले आहे. रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा तसेच, या दिवशी द्यूत (झूगार) खेळावे असेही विधीत म्हटले आहे. या रात्री लक्ष्मी को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत
घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. म्हणून, लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणे दीप लावून प्रकाशमान ठेवावीत. हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते, अशीही एक अख्यायीका आहे.प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता.
ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती.
एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती.
नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता. त्यामुळेच, उत्तरेकडील काही भागांत याला रास पौर्णिमा असं देखील म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. ज्याला कोजागर पौर्णिमा असं देखील म्हणतात.
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेचे व्रत दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला केले जाते. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेची रात्र खूप खास मानली जाते, कारण या रात्री चंद्र पूर्णपणे चमकतो, म्हणजेच चंद्र 16 कलांनी भरलेला असतो.
या दिवशी व्रत पाळल्यास मनुष्य सुख-समृद्धी प्राप्त करतो. तसेच सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.कोजागिरी पौर्णिमा तिथी.पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:41 वाजता सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी गुरुवारी, 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 04:53 वाजता संपेल. अशा परिस्थितीत कोजागिरी पौर्णिमा हा सण 16 ऑक्टोबरलाच साजरा होणार आहे.
या दिवशी संध्याकाळी 05:04 वाजता चंद्रोदय होईल.कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5.05 वाजता होईल. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये खुल्या आकाशाखाली खीर ठेवली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमेला खीर ठेवण्याची वेळ रात्री 08.40 वा. या वेळेपासून कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी युक्त होऊन जगभर
आपली किरणे पसरवेल. पूजेनंतर खीर खुल्या आकाशाखाली ठेवता येते.कोजागिरी पौर्णिमा पूजा पद्धत : संध्याकाळी स्नान : कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.घराची स्वच्छता : घर स्वच्छ करून तुपाचा दिवा लावावा.
लक्ष्मी मातेची पूजा: एका व्यासपीठावर लक्ष्मी मातेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि उदबत्ती लावा. खीर अर्पण करणे: खीर बनवा आणि चांदण्या रात्री देवी लक्ष्मीला अर्पण करा.चंद्राला अर्घ्य : चंद्राला जल अर्पण करा.
मंत्र जप: लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करा.धार्मिक मान्यतांनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र 16 कलांनी बनलेला असतो आणि त्या रात्री अमृताचा वर्षाव होतो. चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शीतलताही मिळते.
या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खीर तयार करून काही काळ ठेवली जाते, जेणेकरून चंद्राच्या किरणांमुळे तिला औषधी गुणधर्म प्राप्त होतात. ते खाल्ल्याने लोकांचे आरोग्य चांगले राहते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो.असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाची पूजा करण्याबरोबरच खीर तयार करून चांदण्या रात्री ठेवली जाते.
या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांवर धन आणि धान्याचा वर्षाव करते. या रात्री चंद्रातून अमृतवृष्टी होते, ज्यामुळे सर्व प्राणी निरोगी आणि दीर्घायुषी होतात. कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री खीर ठेवण्याची परंपरा आहे.
असे मानले जाते की चंद्राची किरणे खीरमध्ये अमृत विरघळतात, जे खाल्ल्याने आरोग्यास लाभ होतो.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते. नंतर खाण्यासाठी चंद्रप्रकाशात सोडले जाते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.