आज कोजागिरी पौर्णिमा, रात्री फक्त करा ही गोष्ट, सकाळी तिजोरी पैशाने भरेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ , भारतात कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू, बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. यालाच बुद्ध पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. हिंदू लोक कोजागरी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा करतात.

तर बौद्ध धर्माचे लोक बुद्ध जयंती म्हणून साजरा करतात. हा दिवस सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात दरम्यान येतो. कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

कोजागिरीच्या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. त्यामुळे घरात पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोडे ही केले जातात. अशी प्रथा काल विवेक या ग्रंथात नोंदवलेली आहे. नवीन धान्य व भाज्या यांची रेलचेल असते.

हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. पोर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तू वर नवी बांधतात.

यावेळी शनिवारी कोजागिरी पौर्णिमा तिथी आली आहे, कोजागिरी पौर्णिमा हे माता लक्ष्मीची पौर्णिमा मानली जाते. असे मानले जाते की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे. लक्ष्मीपूजनाचा जसा दिवाळीचा दिवस एक खास दिवस असतो.

हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तशीच कोजागिरी पौर्णिमेची रात्र महत्त्वाची मानली जाते. या दिवशी खूप सारे लोक जागरण करतात. मंत्र जाप करतात किंवा काही उपाय सुद्धा करतात.

तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडधोड करत असाल, तर कोणता नैवेद्य करत आहात हे पण खूप महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही लक्ष्मी मातेला तसेच स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य या दिवशी देणार आहे याच एक वेगळं महत्व आहे.

शास्त्रात त्याची खूप मान्यता आहे. या दिवशी दुधाच खूप जास्त महत्त्व असते, रात्री दुधाचे पदार्थ करण्याची प्रथा आहे. यालाच खूप जास्त महत्व आहे. कोजागिरीच्या रात्री दूध ठेवून त्यामध्ये चंद्र बघितला, चंद्राचे दर्शन त्या दुधात केले जाते आणि बारा वाजल्यानंतर ते दुध सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण सुद्धा करतात.

कोजागिरीच्या दिवशी कोणता पदार्थ करावा आणि देवीला आणि स्वामींना तो दाखवावा हा प्रश्न सगळ्यांच्याच असतो , या दिवशी तुम्ही दुधाचे पदार्थ करायचे आहेत. दुधाचे पदार्थ आपण खुप सारे करू शकत नाही,

पण एक खूप जास्त महत्त्वाचा पदार्थ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना देखील आवडतो आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असा पदार्थ आहे. तो म्हणजे दुधाची खीर. कोजागिरीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी त्यासोबत चपाती किंवा पुरी किंवा पुरणपोळी करू शकता.

वरण-भात करू शकता किंवा फक्त वाटीमध्ये खीर ठेवली अन ती वाटी दिवस भर देवघरात ठेवली तरी चालते. काहीच केलं नाही तरी चालतं आणि तुम्हाला जमत नसेल तर दुधामध्ये साखर टाका आणि ते गोड दुध लक्ष्मी देवीला, स्वामी समर्थ महाराजांना कोजागिरी दिवशी नक्की करा.

स्वामीजी प्रसन्न होतील. लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होईल आणि रात्री सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता . हा एक छोटासा नैवेद्य नक्की करा. तसेच जेंव्हा सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा कराल तेंव्हा 1 सुपारी नक्की आणावी व त्याला स्वच्छ धुवून पुसून तुम्ही पूजन करा,

मातेसमोर ठेवा, लाल धागा गुंडाळा व मातेचा जप करीत तुम्ही अक्षत अर्पण करा. तसेच जेंव्हा तुम्ही रात्री जागे रहाल ठेंव्ह देखील मंत्र जप करा. सकाळी उठून ही सुपारी घेऊन तुमच्या धन ठेवणाऱ्या जागी ठेवा.

तसेच या रात्री 7 वजेच्या सुमारास तुम्हाला उंबरठयावर बाहेर 5 कापूर थोडे तांदूळ आणि 5 लवंगा जाळा आणि रात्री ते तिथेच राहू द्या. सकाळी ते गटारी मध्ये किंवा कचऱ्यात बाहेरच फेकून द्या. यामुळे आपल घर निर्मल पवित्र ऊर्जा अधिक वाढते. जीवनात असणारी अडचण दूर होते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!