नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे, माता लक्ष्मीचे आगमन होऊन आपल्या घरी भरभराट राहते. या दिवशी आपण लक्ष्मीला आपल्या घरात आवाहन करतो . अशा वेळी काही अडचणी आपल्या घरात असतील तर लक्ष्मी आपल्या घरात कधीच येत नाही.
तिचा सहवास होत नाही. म्हणून ही दिवाळी येण्यापूर्वी वास्तुशास्त्रानुसार या नऊ वस्तू आपण घरातून बाहेर नक्की काढाव्यात. जेणेकरून लक्ष्मी येईल , आपल्या घरात तिचा सहवास होईल.
पहिली वस्तू आहे देवी-देवतांच्या खंडित मूर्ती! आपल्याकडून कधी कधी कळत नकळत एखाद्या देवी देवतेची मूर्ती फुटते, एखाद्या देवतेचा फोटो खराब झालेला असतो आणि अशा फुटलेल्या मूर्ती अशा खंडित प्रतिमा आपल्या घरात वर्षानुवर्षे पडून असतात.
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशा मूर्ती आणि अशा तसबिरी घरात मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न करतात. हे वास्तुदोष घरात घराची बरकत होऊ देत नाहीत. घरातील लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यातील करता पुरुष किंवा करती महिला असेल तिचं नशीब तिला साथ देत नाही.
नशिबात आहे ते सुद्धा प्राप्त होण्यात खूप अडचणी येतात आणि म्हणूनच आपण दिवाळी येण्यापूर्वीच अशा खंडित मूर्ती एखाद्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा ओढा , नदीत प्रवाहित करावे जर तुमच्या भागामध्ये अशाप्रकारे पाणी नसेल तर तुम्ही कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवून परत येऊ शकता.
दुसरी गोष्ट आहे, आपल्या घरात लावलेले पूर्वजांचे फोटो म्हणजेच आपले आजोबा, पणजोबा असे लोक जे हयात नाहीत, त्याचा मृत्यू झालेला आहे , अनेक लोक आपल्या पूर्वजांचे फोटो देवघरात लावतात किंवा देवदेवतांच्या तसबिरी शेजारी हे पूर्वजांचे फोटो लावले जातात.
आपले पूर्वज आपल्याला कितीही प्रिय असले तरी सुद्धा त्यांची बरोबरी ही देवी-देवतांची होऊ शकत नाही. त्या देवघरामध्ये पूर्वजाचे फोटो लावलेले असतात त्या घरातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
असे फोटो सुद्धा आपण देव घरात न लावता योग्य दिशेला लावावे. आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने घराची भरभराट होईल.
दिवाळीमध्ये मागच्या वर्षी वापरलेले जुने दिवे पुन्हा त्याचा पुनर्वापर करत असाल तर चांगली गोष्ट आहे, मात्र ज्या घरात असे जुने कळकट झालेले दिवे यांचा वापर केला जातो, माता लक्ष्मी तिथे प्रसन्न होत नाही, अशा घरात लक्ष्मीची कृपा कधीच बरसत नाही आणि मग तुम्ही जुने दिवे अवश्य वापरा मात्र ते चांगलेच स्वच्छ करून घ्या,
आकर्षक दिसतील स्वच्छ दिसतील याची मात्र काळजी घ्या की आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याच अधिक महत्त्व सांगितले आहे.तिथून घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहेत ,
तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा व्यवस्थित असताना त्याला डाग वगैरे केलेली नाहीत, हा दरवाजा तुटलेला तर नाही ना, तो उघडताना आवाज तर करत नाही याची काळजी घ्या. त्याला तेलपाणी करा, हा दरवाजा स्वच्छ पुसून घ्या, दरवाजावरती स्वस्तिक असेल किंवा नसेल अशी शुभमंगल चिन्ह आपण नक्की काढा.
दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ देण्यास विसरू नका. लक्ष्मीपूजन असेल तेव्हा दिवाळी पाडवा असेल त्या दिवशी आपल्या घराच्या चौकटीला एक छान आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण नक्की लावा. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.
आपल्या घरात जर काही काचेच्या वस्तू तुटलेल्या असतील, त्याला तडा गेलेले आहे असतील तर खूप दोष घडतात. काच ही राहू शी संबंधित वस्तू आहे, ज्या घरात अशाप्रकारे खराब झालेल्या काचेच्या वस्तू असतात त्या घरात राहूचे मोठ्या प्रमाणात दोष वाढतात.
जीवनामध्ये मोठे अपघात एक्सीडेंट होऊ लागतात आणि त्यातून नुकसान होते, म्हणूनच अशा काचेच्या फुटलेल्या वस्तु सुद्धा आपण वेळच्या वेळी घराच्या बाहेर नक्की काढा .
दरम्यान जर सुख नसेल, सतत भांडणे होत असतील, पती-पत्नीमध्ये प्रेम शिल्लक नसल्याने घटस्फोटापर्यंत जर परिस्थिती बिकट झालेली असेल तर अशा वेळी या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या बेडरूम मध्ये बेड कडे नक्की लक्ष द्या .
हा तुटलेला असेल, हा बेड जर खराब झालेले असतील किंवा कोणत्याही प्रकारे तुटला फुटला असेल तर नक्की बदला किंवा घराबाहेर काढा. एक तर तो दुरुस्त करून घ्या किंवा बदला. कारण असा बेड हा पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठ्या समस्या उत्पन्न करतो.
त्यांच्यात सतत कलह उत्पन्न करतो आणि म्हणून हा बेड फार महत्वाचा आहे . दिवाळीच्या पाच दिवसात जर पती-पत्नी सातत्याने भांडत असतील घरामध्ये क्लेश वाद विवाद आणि भांडण असं वातावरण असेल अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही,
याउलट पती-पत्नी एकमेकांवर मनापासून प्रेम करत आहेत, घरामध्ये सुखसंवाद पूर्ण वातावरण निर्माण करतात, त्यासाठी काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीला सुद्धा अशीच वास्तू ही अत्यंत प्रिय असते.
आपल्या घरात घड्याळ असतात,जर एका पेक्षा जास्त असतील तर ती एकच वेळ दर्शवीत आहेत याची पुरेपूर काळजी घ्या. ज्या घरामध्ये घड्याळ वेगवेगळे वेळ दर्शवतात त्या घरात कलह मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात.
अगदी किरकोळ गोष्टीचं रूपांतर हे मोठ्या वाद-विवाद मध्ये होते. घड्याळ स्वच्छ असावे , घड्याळ तुटलेल असेल, बंद पडलेला असेल तर त्वरित दुरुस्त करून घ्या. जर ते दुरुस्त होत नसेल तर अशी बंद पडलेली घड्याळ लवकरात लवकर दिवाळीपूर्वीच आपण घराबाहेर टाकून द्या.
कारण हे घड्याळ मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न करतात . वास्तु दोष उत्पन्न करतात . त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा कोणत्याही प्रकारचा खराब झालेले फर्निचर असेल या सुद्धा गोष्टी वेळच्या वेळी बदला. आपल्या घरामध्ये जर चांगले कपडे असतील तर ते आपण एखाद्या व्यक्तीस दान करू शकता,
मात्र खूप दीर्घकाळापासून जर कपडे पडून आहेत तर हे कपडेसुद्धा वास्तु दोष उत्पन्न करतात. जर चपला कुठेही खराब झालेले असेल, तुटलेली असतील त्यांची सुद्धा आपण विल्हेवाट लावा किंवा ती दुरुस्त करून घ्या .
सर्वात शेवटची गोष्ट सांगितली ती म्हणजे आपल्या घराचे जड साहित्य आहे त्याचा वापर होत नाही असं साहित्य आपण घराच्या नैऋत्य कोपरा मध्ये ठेवा, हे साहित्य ईशान्य दिशेला ठेवू नका म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधील दिशा, ज्या घरात या ईशान्य कोपऱ्यामध्ये अस्वच्छता असते, जड साहित्य ठेवलं जातं,
त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही, असं साहित्य त्या ठिकाणाहून उचलून आपके नैऋत्य कोपर्यात म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधले दिशात या नैऋत्य कोपरा मध्ये ठेवून द्या.
ईशान्य कोपरा नेहमी साफ सुंदर ठेवा. हा देवांचा कोपरा आहे. दिवाळी येण्यापूर्वी काही गोष्टींचं पालन करा पण केलं तर महालक्ष्मी नक्की आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.