नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरूपौर्णिमा दिवशी स्वामींना गुरुपद कसे द्यावे?
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.
श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यासाठी राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त येतात.
यावेळी 3 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास दिवस मानला जातो.आपण स्वामींची विशेष सेवा करतो आणि काही फक्त स्वामींचे गुरुपद या दिवशी घेत असतात.
तसंच खूप लोक स्वामींना गुरु करतात ,परंतु आता सध्या कोरोनाच्या काळात केंद्र बंद असल्याने , बऱ्याच स्वामीभक्तांना माहिती नसते की, घरी राहून सुद्धा स्वामींचे गुरुपद कसे घ्यावे.
कारण प्रत्येक गुरुपौर्णिमाला खूप लोकं ही स्वामींना आपला गुरु करून घेण्यासाठी इच्छुक असतात. आत्ता याच भक्तासाठी ते भक्त घरातूनच काही विशेष विधी करून स्वामींचे गुरुपद घेऊ शकतात. हा संपूर्ण विधी अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा आहे.
पण हा विधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजेच्या आत ,कधीही तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही सर्वात आधी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची आधी दुधाने अभिषेक करावा मग नंतर त्याच्या पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यावा.
हे सगळे झाल्यानंतर पाटावर किंवा चौरंगवर ठेवावा ,आणि त्यावर सफेद कापड किंवा लाल रंगाचा कापड ठेऊन, त्यावर स्वामींची अभिषेक झालेली मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
यासह विधिवत अष्ट,गंध ,अक्षता, फूल वाहून त्या मूर्तीची पूर्ण श्रद्धेने पूजा करून घ्यावी.त्यापुढे दिवा तसेच अगरबत्ती लावावी.या सगळ्या विधी झाल्यावर 16 वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थच्या पुढे बसून श्री पुरुष सूक्त वाचायचे आहे.
तसेच 16 वेळेस श्रीसूक्तही वाचावे.आपल्या स्वामी समर्थांच्या नित्य सेवा केली पाहिजे. मग हे सूक्त वाचून झाल्यानंतर स्वामींना मनापासून आवाहन करायचे आहे.
यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आज गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हाला गुरू करून घेण्यासाठी तुम्हाला आवाहन करत आहोत.याशिवाय “तुम्ही आमचे गुरू माता-पिता सर्वस्व आहात ,आज पासून पुढील गुरुपौर्णिमा पर्यंत आमचे गुरु पद स्वीकारून,
आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद देऊन आपल्या संरक्षण करावे,” बोलल्यानंतर तुम्ही एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा.
याशिवाय शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचन करावे.तसेच अभिषेक केलेला तीर्थ पूर्ण कुटुंबातील सदस्यना वाटून घ्यावा. यासह पुजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवावा.
अशा रीतीने तुम्ही स्वामींची गुरुपद घेऊ शकतात तसेच आपण स्वामींना गुरु करू शकतात किंवा हे शक्य नसल्यास मनातल्या मनात स्वामींना गुरु मानून त्याची सेवा करावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.