नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीच्या नऊ दिवसात घटात महिलांनी करू नका हि 7 कामे, स्त्रियांनी पाळा हे नियम…
बऱ्याचदा काही अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करतो ही मदत आर्थिक स्वरूपात सुदधा असते. काही वेळेस आपण पैसे उधार देतो किंवा परत देण्याच्या मुदतीवर उसने देतो व आपल्या काही व्यक्तींना अशी मदत करतो.
अडचण ही सर्वांनाचं असते त्यामुळे आपण चांगल्या भावनेने मदत करतो परंतु काही लोक जे बोलतात तसे वागत नाहीत. काही लोक पैसे घेताना चांगले वागतात, मुदत मागून गयावया करतात पण परत करायच्या वेळी टाळाटाळ करतात काहीजण गायब होतात.
आपले घेतलेले पैसे घेऊन जर एक महिना, दोन महिने थोडक्यात अल्प कालावधी झाला असेल तर नक्की तुम्ही हे काही तांत्रिक उपाय करून पहा ज्यामुळे तुमचे पैस नक्की करत येतील.
हे दोन उपाय शास्त्रा नुसार अतिशय प्रभावी मानले जातात ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे पैसे परत येतील. पहिला उपाय तुम्हाला रविवार किंवा गुरुवारी करायचा आहे.
त्या त्या दिवसांना त्यांचे वेगळे महत्व असते त्या दिवशी तो उपाय केल्याने फळ मिळण्यात विलंब होत नाही. त्या दिवशी सूर्योदयापूर्वी पहाटे उठून स्वच्छ स्नान करून एक आसन घेऊन खाली आपले मुख पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने बसायचे आहे.
“ओम आदित्याय नमः ” या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर जेव्हा सुर्योदय होईल तेव्हा तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी घ्या व त्यामध्ये उजव्या हाताने लाल मिरचीचे बिया त्या कलशात टाका.
हे जल सूर्यदेवाला अर्पण करताना “ओम आदित्याय नमः ” या मंत्राचा जप सुरू ठेवायचाच आहे. हा उपाय तुम्ही दर गुरुवारी किंवा रविवारी पुन्हा पुन्हा करा जोवर तुमचे पैसे परत येत नाहीत. काही दिवसातच याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.
तुमचे पैसे घेऊन जर बराच काळ म्हणजे वर्ष दोन वर्षे झाली असतील तर तुम्ही हा दुसरा प्रभावी उपाय करून पहा. समोरच्या व्यक्तीकडून जर तुमचे पैसे येण्याची आशा संपत चालली असेल तर हा उपाय करा.
त्यासाठी रविवारी तुम्हाला एक तांबे धातूपासून बनलेले कोणतेही पात्र , ताट, प्लेट घ्यायची आहे व देशी कापूर भरपूर लागणार आहे व देठासहित विड्याचे पान किंवा नागिणीचे पान त्या तांब्याच्या पात्रावर ठेवा पालथे न घालता सरळ ठेवा व त्यावर हा देशी कापूर जाळायचा आहे.
एक भोजपत्र लागणार आहे किंवा ते जर नसेल तर साधा कागद घेतला तरी चालतो परंतु तो कागद कोरा व स्वच्छ असावा व त्यावर कोणत्याही रेषा नकोत. या कागदावर त्या जाळलेल्या कापराच्या काजळीने त्या व्यक्तीचे नाव लिहा ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत.
तसेच त्या कागदावर तुम्ही सात वेळा उजव्या हाताने थाप मारायची आहे व मारत असताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन तुमचे पैसे परत येण्याची इच्छा व्यक्त करा.
एवढे झाल्यावर तुम्ही तो कागद तुमच्या तिजोरीत जिथे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवता तिथे नाव वरती दिसेल असा ठेवायचा आहे. त्यावरती एक दगड जो स्वच्छ धुवून कुंकूत बुडवून ठेवा. हा उपाय केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान होत नाही ,
तर त्या व्यक्तीस तुमचे पैसे परत देण्याचा विचार सतावतो, ती व्यक्ती तुमचे पैसे भागवण्यासाठी तत्पर राहते व प्रयत्न करून पैसे परत करते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून फक्त इन उपाय आहे जो स्वतःच्या व इतरांच्या भल्याचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.