नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जे आपणासी भावे ते देवासी अर्पावे’ या भोळ्या भावनेतून मनुष्य देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जे आपल्याला आवडते ते आधी देवाला अर्पण करतो. एवढेच नाही तर आपल्या सण उत्सवामध्ये त्याला मुख्य स्थान देतो.
तसेच काही सण देवाचेच घोषित करून मोकळा होतो. तर तुम्हाला दत्त जयंती येईपर्यत आणि दत्त जयंती दिवशी एक चमत्कारिक उपाय करायचा आहे.
7 डिसेंबर दत्त जयंती दिवशी पितरांच्या नावाने अन्नदान करून व वस्त्र दान केल्याने पितरांना प्रसन्न केले जाते, असे सांगितले जाते. शक्य असल्यास दर एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे.
या दिवशी जिथे एकीकडे भगवान विष्णूची पूजा केली जाते, तिथे दुसऱ्या बाजूला भगवान शंकराची पूजा करण्याचाही नियम आहे. त्यामुळे भोले शंकराची पूजा केल्याने कार्लसर्पाचे उपायही फलदायी ठरतात.
भगवान शंकराला रुद्राभिषेक केल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या दिवशी गाईला ही 1 वस्तू खायला दिल्यास तुम्हाला 7 पिढ्या पैसा कमी पडणार नाही..
गाईला आपल्या धर्मात दैवी मानले जाते. गाईची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. जी व्यक्ती गाईचे पूजन नित्यनियमाने व योग्य पद्धतीने करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना स्वतः श्री कृष्ण भगवंत पूर्ण करतात.
आजच्या माहितीत आपण गाईचे पूजन करताना पाळायचे काही नियम पाहणार आहोत. जर या नियमांप्रमाणे आपण गाईचे पूजन केले व प्रत्येक गुरुवारी नियम पाळले तर आपल्याला त्याचे परिणाम तात्काळ मिळते.
ज्या घरातील व्यक्ती नित्यनियमाने गाईचे पूजन करतात. त्यांच्या घरात श्री लक्ष्मी देवीचा स्थिर वास राहतो.
आपल्या जीवनात काही संकटे असतील, आपल्या कार्यात काही अडचणी येत असतील, कोणतेही कार्य होता होता मध्ये अडकत असतील,
खूप कष्ट करूनही त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसेल, काही केल्या प्रगतीच होत नसेल, आर्थिक अडचण असेल, संतान प्राप्तीत अडथळे येत असतील, तर गायीचे पूजन नक्की करा.
शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचे वास्तव्य असते. गाईचे शेण व गोमूत्र हे खूप पवित्र मानले जाते. फक्त गायीचे पूजन केल्यानेच सर्व देवी देवता व आपले पित्र प्रसन्न होतात.
आता आपण पाहू या की, गायीच्या पूजनाचे काय नियम आहेत. सर्वात आधी गोमाते समोर हात जोडावेत आपली इच्छा बोलुन ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. तसेच आपल्या काही अडचणी असतील तर त्याही दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.
आपल्या सर्व अडचणींपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी गाईला ताजी पोळी व गुळ खायला द्यावे. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी, एकादशीला, अमावस्याला पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता.
या उपायामुळे आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट झाल्याचे दिसून येईल. हळूहळू आपल्या जीवनात सर्वकाही चांगले घडण्याचे आपल्याला जाणवेल. दुसरा नियम म्हणजे या दिवशी हिरवा चारा आणून त्या चाऱ्याचे पाच छोट्या छोट्या पेंड्या कराव्यात.
व एक पेंडी एका गाईला अशाप्रकारे पाच गाईंना हा चारा खायला द्यावा. गाईला हिरवा चारा खायला दिल्यास जीवनात सर्वकाही हिरवेगार व सुंदर होते. गाईला कोणतीही वस्तू खायला देण्यापूर्वी गाईच्या पुढे कुंकवाने एक स्वस्तिक काढावे.
ते तुम्ही भिंतीवर, दारावर जेथे शक्य होईल तेथे काढू शकता. गाई वासरांवर श्रीकृष्णांचे भरपूर प्रेम होतं. ते स्वतः गाईंना चारण्यासाठी रानावनात घेऊन जात असत व गाईंना हिरवा चारा खायला घालत असत.
म्हणूनच श्रीकृष्णांना गोपालही म्हटले जाते. म्हणून हिरवा चारा गाईला खायला घातल्यास आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते.
पुढील उपाय म्हणजे, या दिवशी कणकेचा गोळा घ्यावा त्यामध्ये थोडेसे गुळ व चणाडाळ टाकावी. कणीक मळतानाच त्यामध्ये हळद टाकावे. नंतर श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे.
पूजा करताना हा तयार केलेला कणकेचा गोळा श्रीहरी विष्णू समोर ठेवावा व पूजनानंतर हा कणकेचा गोळा गाईला खायला घालावा. गाईला सात प्रदक्षिणा घालाव्यात. आपली जी काही इच्छा व मनोकामना असेल ती गोमाता समोर प्रकट करावे.
या उपायांमुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होऊन, सर्व प्रकारच्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. या उपायांपैकी आपल्याला जो शक्य होईल असा एक उपाय सुद्धा आपण करू शकतो आणि जमल्यास सर्व उपाय ही आपण करू शकतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.