नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न पडतो की कोणतीही सेवा करताना मांसाहार करणे कितपत योग्य आणि अयोग्य आहे ? मनात कोणतीही शंका न घेत हा लेख वाचा. तुम्ही स्वामी भक्त असाल नसाल पण हे नक्की जाणून घ्या.
मांसाहार करणे पाप आहे की पुण्य काय सांगतात श्री स्वामी महाराज. मांसाहार करणे पाप आहे की पुण्य या विषयाला घेऊन वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मत आहेत. एकीकडे मांसाहार करणे हे योग्य प्रतीचा आहार मानला जातो.
तर दुसरीकडे हाच मांसाहार करणे त्याला पाप समजले जाते. गरुड पुराणांमध्ये एक कथा सांगितली गेली आहे.
ती कथा ऐकल्यावर तुम्हाला स्वतः कळल मांसाहार करणे योग्य आहे की अयोग्य.आपल शास्त्र आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आणि अगदी सर्व शंका दूर करते.
भगवान श्रीकृष्ण एकदा बासरी वाजवत झाडाखाली बसले होते. तेव्हा एक हरीण तिथे आलं त्याच्या पाठोपाठ एक शिकारी आला आणि म्हणाला ती शिकार माझी आहे ती मला द्या.
कोणत्याही जीवाला मारून खाणे योग्य नाही ते पाप आहे. त्यावर त्या शिकारणे उत्तर दिले मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही. पण माहिती आहे की कोणत्या जीवाला मारून खाणे हे पाप नाही.
मी त्याला मारून मुक्त केले आहे जुन्या काळामध्ये मोठ-मोठी राजे प्राण्यांना मारून आपली भुक भागवत होते.
तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक कथा ऐकण्यास सांगितले शिकारी कथा ऐकण्यास तयार झाला. भगवान श्रीकृष्णांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. एकदा एका गावामध्ये अन्नटंचाई ची समस्या सुरू झाली.
त्या गावच्या महाराजांना त्या गावच्या लोकांची फार चिंता वाटू लागली. राजांनी एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सर्वात स्वस्त कोणती गोष्ट आहे.
ज्याने प्रजेच्या भुकेचा प्रश्न मिटेल सर्वांनी आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शिकारी प्रेमी अधिकारी आपले मत सांगण्यासाठी पुढे आले.
आणि राजाला म्हणाले सर्वात स्वस्त आहे मांस हे ऐकल्यावर त्या राजाचा प्रधानमंत्री यांनी आपले मत मांडण्यासाठी त्याच्याकडे थोडा वेळ मागितला त्या रात्रीतू प्रधानमंत्री त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला.
आणि सांगितलं राजा ची तब्येत अचानक बिघडली आहे. आणि औषध म्हणून एक बलाढ्य व्यक्तीच्या शरीराचे दोन किलो मास हवे आहे. तुम्ही योग्य व्यक्ती आहे मी तुम्हाला एक लाख सोन्याच्या मुद्रा देतो.
यावर अधिकारी घाबरला आणि आत मध्ये जाऊन आणखीन एक लाख मुद्रा घेऊन आला पाणी प्रधानमंत्री ला सांगितलं जीवच नाही राहिला तर काय करू मी काय करू ह्या एक लाख मुद्राच तुम्ही घेऊन जा आणि दुसरा व्यक्ती शोधा प्रधानमंत्री नेते दोन लाख मुद्रा घेऊन खूप अधिकाऱ्यांकडे जाऊन पाहिले .
पण कोणीही माऊस द्यायला तयार झाले नाही . असं करत करत प्रधान म्हणून त्याकडे अब्जावधी मुद्रा जमा झाल्या दुसऱ्या दिवशी सभेमध्ये प्रधानमंत्री ने त्या सर्व मुद्रा राजासमोर आणल्या आणि म्हणाला खरच मांस खूप स्वस्त आहे.
राजाने त्या सर्व मुद्रा घेऊन अन्नधान्य साठा केला आणि शेतामध्ये बदल करुन भरगोस उत्पादन केले आणि अन्न टंचाईचा प्रश्न सोडवला शेवटी मंत्र्यांने अधिकाऱ्याला सांगितले की जसा आपला जीव आपल्याला मोलाचा वाटतो सर्वांनाच स्वतःचा जीव मोलाचा वाटतो.
कोणाचा जीव घेतला तर त्याचे पाप आपल्याला ह्या जन्मी नाही तर पुढच्या अनेक जन्मी भोगावे लागतात त्या अधिकाऱ्याला त्याची चूक समजली आणि त्यांनी माफी मागितली आणि बोलला की मी इथून पुढे कोणत्याही प्राण्यांचे जीव घेणार नाही. यावरून आपल्याला समजते की सकस आहार शुद्ध शाकाहार .
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.