मार्गशिर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी इथे काढा 1 स्वस्तिक, मोठ्या कर्जातून मुक्ती होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सध्या मार्गशीष महिना सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये मार्गशीष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये माता लक्ष्मी आणि श्री नारायण यांची एकत्रित पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

या महिन्यांमध्ये अनेक महिला आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती ऐश्वर्य आणि संपत्ती यावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहावी, यासाठी गुरुवारचे व्रत करतात.

त्यामुळे आपल्याला ही गुरूवारची माता लक्ष्मीची पूजा करताना ही 1 विशेष वस्तू माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होती आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य येईल. या दिवशी व्रत करणार्‍या व्यक्तीने लवकर उठायचे आहे, मग अंघोळ केल्या नंतर आणि त्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे. तसेच या मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे.

सर्वप्रथम यामध्ये सर्वात सकाळी उठल्यावर आधी घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला पाहिजे. त्याची पूजा व प्रार्थना करताना ही मुख्य दरवाजा असावा. मग त्यानंतर सर्वात आधी उंबरठ्यावर पाणी शिंपडा.

वे म्हणजे रात्रभर जमा झालेली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी व घरात येऊ नये, यासाठी एक तांब्याचा कलश ठेऊन त्यात पाणी भरून तो तांब्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवून घ्यावा.

तसेच सकाळी हेच पाणी घेवून घराच्या उंबरठ्यावर शिंपडावे. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर त्यात तुम्ही थोडीशी हळद, गुलाब पाणी व अत्तरही टाकू शकता. मुख्य दाराच्या वरती देवी लक्ष्मीचा फोटो लावावा .

आणि घराबाहेर पडताना देवीचे दर्शन करून बाहेर पडावे. तसेच घराची डोअर बेल असा प्रकारे ठेवावी की ती आपण उजव्या हाताने वाजवली पाहिजे. चपला-बूट या वस्तू घराच्या उजव्या बाजूला असाव्यात.

याशिवाय, सर्वात महत्त्वाचे आपल्या घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला कुंकू, चंदन आणि केशर व हळद मिक्स करून त्या मिश्रण एकजीव करून त्यानें स्वस्तिक चिन्ह काढावे.

कारण स्वस्तिक हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. आजकाल दुकानात प्लास्टिकचे स्टिकर विकत मिळतात, परंतु त्यांच्या पासून म्हणावे तितके सकारात्मकता प्राप्त होत नाहीये.

मुख्य दारासमोर रांगोळी काढावी. कारण रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते, यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते व नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही.

विशेष रांगोळी देवीची पावले काढली जातात. परंतु विशेष लक्ष द्यावे की ही पावले आपल्या घरात प्रवेश करणारी असावीत. ही पावले अष्टदल कमळाच्या आत असतील तर खूपच चांगले आहे.

याचबरोबर येतेही प्लास्टिकचा वापर करू नये. ते दिसायला कितीही आकर्षक असली, तरी त्यातून सकारात्मकता मिळत नाही. तसेच प्लास्टिकचे तोरणही लावू नये. कोणत्याही मंगल प्रसंगी दाराला तोरण लावले जाते.

तसेच विविध प्रकारचे तोरण लावले जातात. परंतु आंब्याच्या पानांचे तोरण खूप चांगले असते. आंब्याला पाणी न मिळाल्यास अशोकाची पाने किंवा पिंपळाचे पाने घेऊनही तोरण लावू शकता.

हे तुम्ही कोणतेही दिवशी लावू शकता. परंतु मंगळवारी हे तोरण लावणे खूप शुभ असते. आंब्याच्या पानामुळे सुख आपल्या घराकडे आकर्षित होते. त्या बरोबरच आपल्या मनाच्या चिंताही दूर होतात.

म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दारावर जरूर लावावे. आपल्या घराच्या मुख्य दाराच्या बाजूला दोन्ही बाजूने दोन तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात. तुमच्या अंगणात तुळशी वृंदावन असले तरीही वास्तू दोष दूर करण्यासाठी दोन्ही बाजूला दोन तुळशीच्या कुंड्या लावाव्यात.

आपल्या घराला दृष्ट लागू नये, यासाठी नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानची फोटो दारावर जरूर लावावेत. तुरटीचा खडा लाल कापडात बांधून तेही मुख्य दारावर बांधावी. तसेच लिंबू मिरच्या टांगव्यात.

तसेच मुख्य द्वारावर वरती तांब्याचा सूर्य लावावा. यामुळे घराचे नजरदोषपासून संरक्षण होते. रात्री मुख्य दाराजवळ झाडू आडवा ठेवावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.

आपण कितीतरी घरांमध्ये मुख्य दारावर घोड्याचे नाळ लावलेली बघतो. परंतु हे नाळ घोड्याच्या पायात टाकलेली असावी, याचा वापर झालेला असावा.

नवीन घोड्याचे नाळ घरात लावल्याने काहीही फायदा होत नाही. नाळ लावायचे असेल, तर शुक्रवारी घोड्याच्या पायातील नाळ विकत आणावे व रात्रभर ती नाळ राईच्या तेलात बुडवून ठेवावी.

आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते मुख्य दारावर लावावी. संध्याकाळच्या वेळी मुख्य दारजवळ दोन दिवे लावावे. म्हणजे संध्याकाळच्या वेळी मुख्य दारासमोर अंधार नसावा.

आजकाल फॅशन म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर वॉटर फाउंटन लावलेले असतात, परंतु प्राचीन काळापासून दारावर स्वागत करण्यासाठी कलशाची स्थापना केली जात होते.

मुख्य द्वारावर मानल्या जाणार्‍या कलशाचे मुख मोठे व रुंद असते, त्यात पाणी टाकून शक्य झाल्यास फुलांच्या पाकळ्या टाकतात. अशाप्रकारे घराच्या मुख्य दारासमोर पाण्याचा कलर ठेवल्या कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.

मुख्य दाराच्या अगदी समोर चौक, तलाव, गटार दुसऱ्या एखाद्या घराचा कोपरा किंवा जिना, खूप मोठे झाड चांगले मानले जात नाहीत.

मुख्य दारासमोर जर एखादे मोठे झाड असेल व त्याची सावली आपल्या घरावर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत पडत असेल तर हे अशुभ मानले जाते. तसेच मंदिरात किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली पडणेही शुभ नसते.

मुख्य दार इतर दारांपेक्षा उंच व रुंद असावे. मुख्य दाराची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा दुप्पट असावे. मुख्य दार आत उघडणारे असावे. बाहेर उघडणारे असले तर प्रत्येक कार्यात अडचणी येतात.

मुख्य दारासमोर दुसरे एक सेफ्टी दोर खूप शुभ असते. याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जर दारापुढे दार लावायचे नसेल तर बाजूला एक खिडकी जरूर ठेवावी.

जर तुम्ही मुख्य दाराला रंग देऊ शकत नसाल तर या रंगांचा फोटोही तुम्ही मुख्य दारावर लावू शकता. घराचे मुख्य दार उत्तरेकडे असेल, तर या याचा रंग निळा किंवा आकाशी असावा.

मुख्य दार पूर्व दिशेला असेल, तर त्याचा रंग पिवळा किंवा केशरी असावा. मुख्य दार दक्षिण दिशेला असते तर मुख्य दार बदामी रंगाचे असावे आणि मुख्य दार पश्चिम दिशेला असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील दार लाभदायक मानले जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!