नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण ऐकले असेल की, संकल्प सोडावा लागतो किंवा कोणतीतरी सेवा कोणतेतरी पारायण काहीतरी करण्याआधी एक संकल्प सोडावा लागतो, संकल्पमध्ये आपल्या इच्छा सांगत असतो.
आपल्या अडचण बोलत असतो, त्या दूर करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि मग कोणती तरी सेवा आपण सुरू करत असतो. मग हा संकल्प कसा सोडावा?,
काय बोलावे?, कोणत्या दिवशी सोडावे? असे प्रश्न अनेक लोकांना पडत असतात.
जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर स्वामींचा वार गुरुवार आहे, म्हणून आपण कोणतीही सेवा तुम्ही कोणतीही सेवा तुमच्या मनापासून जरी करत असला.
तरी ती सेवा गुरुवारच्या दिवशी सुरू करावी, कोणतीही सेवा असेल तरी ती सेवा गुरुवारी करावी.
कारण आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे. लक्ष्मी स्वामींना मानत असाल तर संकल्प सोडताना काय बोलावे तर संकल्प सोडताना बरेच मंत्र बोलले जातात.
परंतु जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात तर फक्त “श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ”, असे बोलावे.
कारण आपण त्यांनाच मानतो आणि त्यांच्यामध्ये सर्व ब्रह्मांड वसलेला आहे. तर गुरूवारच्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारच्या 12 वाजेच्या आत त्याच्या आतच संकल्प सोडायचा आहे.
आता तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि गुरूवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवाचा दिवा लावायचा आहे.मग अगरबत्ती लावायची आहे. मग त्यानंतर शुद्ध पाण्याचा एक तांब्या घ्यायचा आहे.
ते सगळं घेऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आणि नमस्कार करून तर आपला उजवा हात समोर करायचा आणि त्या आपल्या हातामध्ये शुद्ध पाणी टाकायचे .
आणि त्यानंतर जो डावा हात असतो तो डावा हात उजव्या हाताखाली लावायचा आणि नंतर डोळे बंद करून तुम्हाला जे बोलायचं, मागायचे असेल जी इच्छा असेल सर्व बोलायचे आहे.
मग सर्व इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही ते पाणी ताटात घेतले असेल, त्यामध्ये तुम्हाला हळू टाकायचा आहे आणि ते टाकत असताना “श्री स्वामी समर्थ”,”श्री स्वामी समर्थ”, जप करायचा.
मग त्यानंतर जो ओला हात असतो तो आपल्या डोक्यावर लावायचा आहे आणि पुन्हा आपले दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा. हा संकल्प झाल्यावर आपल्याला स्वामीची अगदी सोपी सेवा करायची आहे.
यामध्ये तुम्हाला रोज अकरा माळी “श्री स्वामी समर्थ”, हा स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्रमधील 14 वा अध्याय वाचायचा आहे. अकरा माळी जप आणि गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय दोनच गोष्टी तुम्हाला रोज करायचा आहे.
संकल्प एकदा सोडायचा आणि या दोन गोष्टी कायमस्वरूपी करा. कायमस्वरूपी शक्य नसेल तर 1-2 महिना तरी करुन बघा आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही संकल्प सोडून ही सेवा करत आहात.
या गोष्टींमध्ये फरक जाणवेल, ती गोष्ट पूर्ण होईल. त्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रभाव पडलेला दिसेल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.