नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो.
नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते.
अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो.
शुभं करोति म्हणताना त्यात एक ओळ आहे, ज्यात ‘दिवा जळू दे सारी रात’ असे म्हटले आहे. म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत, निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल, तूप घालण्याएवढे वैभव आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना केली आहे.
छोट्याशा ओळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना? वैभव आपल्याला, उजेड देवाला आणि सौख्य घराला! म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावण्याचा प्रघात आहे. जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो. पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय?
घरात सुख, समृद्धी, शांती नांदावी म्हणून आपण सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो. बाहेर कितीही झगमगाट असला तरी संथ तेवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते.
देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच, पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते. त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते.
परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही, त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते. ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो, पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो.
पण शास्त्रात म्हटले आहे, की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका. तर पुढील नियमांचे पालन करा. ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो, त्याबरोबरच अर्धवट जळलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
निर्माल्याच्या फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळलेल्या वातीला चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरावे.हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे, आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळलेली वात विसर्जित करावी.
तसेच देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये, थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी, अर्थात दिव्याला निरोप द्यावा.रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी. तेलात भिजवावी. मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा ठेवावा.
निरांजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या न वापरता तुपात भिजवून ठेवाव्या, मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा.देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप, तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी. दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार ठेवाव्यात.
काजळी धरेल एवढी मोठी वात ठेवू नये. दिव्याची ज्योत नेहमी माध्यम असावी. वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्माल्यात टाकून वरील दिलेल्या नियमाप्रमाणे वापर करावा. पूजा कक्ष वास्तुशास्त्रानुसार ईशान्य ही तुमच्या मंदिराची आदर्श दिशा आहे. तथापि, तुमच्या घरातील तुमच्या पूजेसाठी योग्य खोली निवडणे देखील महत्त्वाचे आहे.
विविध पर्यायांपैकी, दिवाणखाना हा बऱ्याचदा सर्वोत्तम पर्याय असतो – जर तो ईशान्य दिशेला असेल तर. तद्वतच, सकारात्मक उर्जेचा प्रवाह जास्तीत जास्त करण्यासाठी आणि तुमच्या प्रार्थना आणि विधींसाठी शांत वातावरण निर्माण करण्यासाठी तुमची पूजा खोली चांगली प्रकाशमान आणि हवेशीर क्षेत्रात असावी.
वास्तुशास्त्रानुसार दिवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. ही दिशा उगवत्या सूर्याशी संबंधित आहे, नवीन सुरुवात, चैतन्य आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.