कोजागिरी पौर्णिमा, असे करा कुंकुमार्चन, पैसा कधीच कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनोहिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. आपण त्याला रास पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत म्हणूनदेखील ओळखतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर येते असे मानले जाते. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. स्त्रिया या दिवशी उपवासदेखील करतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय केल्याने आर्थिक संकट, पैशाची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून मुक्ती मिळू शकते.

उद्या कोजागिरी पौर्णिमा रात्र आहे. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता राहात असेल किंवा तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करा आणि 5 ते 7 कवड्या सोबत ठेवा.

सकाळी या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृतवृष्टी होते,

त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीरही ठेवावी. ही खीर रात्रभर अशीच राहू द्या. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला. यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे. – जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असेल.

तर यापासून सुटका मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला सुपारी अर्पण करा. ही सुपारी लाल रंगात गुंडाळा आणि अक्षता आणि कुंकू लावून लक्ष्मीच्या चरणी ठेवा. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या धनस्थानावर ठेवा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

– नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजीसमोर चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. यासोबतच नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा,

मनोकामना होतात पूर्ण – जर तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर शरद पौर्णिमेला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. एका पाटावर लाल रंगाचे कापड ठेवून त्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णू बसवा.

यानंतर गंगाजल शिंपडा आणि तुळशीची पानं अर्पण करावी. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा, यामुळे घराची आर्थिक भरभराट होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल, तर हा उपाय फायदेशीर ठरेल.विष्णू सहस्त्रनाम, श्री सुक्त याचं पठण करा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा करा. असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते, घरात श्रीमंती येते.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी.

रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला, यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे.

रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा, यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर चारमुखी दिवा लावा.

असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. यासोबतच नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा, यामुळे घरात शांति टिकून राहते.

रात्री देवी लक्ष्म समोर 4 वाती तुपाचा दिवा लावा, असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.
कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात, शक्य नसल्यास रात्री 1 वाजेपर्यंत जागरण करावं, यामुळे तुम्हाला मानसिक शांति लाभेल.

इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील पायापासून डोक्यापर्यंत १०८ वेळेस वाहिल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्या पर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.

देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र या गोष्टींचा वापर करावा.कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.

त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच अंगठा ,मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकु घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वहावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा. हे कुंकू कोरडे असावे.कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते

जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते;

म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.

अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत भरून ठेवावे. कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!