नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. यावेळी 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीपूर्वी लोक घरांची साफसफाई करायला लागतात कारण जे घर स्वच्छ असते त्या घरातच लक्ष्मीचा प्रवेश होतो असे म्हणतात.
ज्या घरात घाण असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही, अशा घरात गरिबी वास करते. दिवाळीत घराची साफसफाई करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. काही गोष्टी चुकूनही करू नयेत.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच्यापासून दिवाळीला सुरुवात होत असते.
त्या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने मनुष्याला जीवनात सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या बरोबरच आरोग्य प्राप्त होते.
हा दिवस भगवान धन्वंतरी ला समर्पित आहे. हा दिवस भगवान धन्वंतरी चा जन्म दिवस मानला जातो. समुद्र मंथन करत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी भगवान धन्वंतरी बरोबर माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
आरोग्याची प्राप्ती सुद्धा होते. याशिवाय, आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करीत असतो. तसेच घरात सुख आणि धनाची भरभराट होण्यासाठी यासाठी आपण देवाची आराधना मनोभावे पूजा करीत असतो.
त्यामुळे आपण जर या पूजेबरोबर काही हे विशेष सोपे काम केले, तर आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करता येऊ शकतात, कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो, असेही म्हणतात.
त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये यासाठी घराच्या मुख्य दरवाजाला ही 1 चमत्कारिक वस्तू नक्कीच बांधावी.
तसेच मुख्य दरवाजाला ही एक वस्तू बांधा.
या उपायांमुळे आपल्या घरातले सर्व वातावरण आनंदमय होऊन घरात सुख समृद्धी आणि पैशाची आवक वाढते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते. जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत.
यासारखे अनेक फायदे होत असतात. या उपायांमध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराला एक वस्तू बांधायची आहे.त्यामुळे आपल्या घरावर कोणतेही प्रकारचे वाईट संकट किंवा कोणतीही समस्या, अडचण घरात येणार नाही .
कारण त्या वस्तूमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की त्यामुळे या सर्व वाईट शक्तीचा विनाश करून त्याना घरात प्रवेश करु देत नाही. मग परिणामी आपल्या घरात बरकत राहण्यास मदत होते तसेच सुख-समृद्धी राहून, नकारात्मकता वाईट शक्ती घरात टिकू शकणार नाही.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त घराच्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही बाजूला बाहेरून एक तुरटी बांधायची आहे.
ही तुरटी तुम्हाला बाजारपेठ मध्ये किंवा कोणत्याही मसाल्याचा दुकानांमध्ये सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होईल.मग ही तुरटी आणल्यावर तिला स्वच्छ करून एका काळ्या कपड्यात तिला बांधायची आहे.
मग ही तुरटी बांधल्यानंतर सरळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य दाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बाहेरून व्यवस्थित बांधुन घ्यावी.
या एका साध्या उपायामुळे आपल्या घरात कधीच वाईट ऊर्जा निर्माण होत नाही किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही. याशिवाय आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही,कोणत्याही प्रकारची संकट प्रवेश करू शकणार नाहीत आणि त्यामुळे घरात सकारात्मकता आणि दैवी शक्ती राहण्यास मदत होईल. मग परिणामी घरात सदैव बरकत आणि सुख-समृद्धी राहते.
यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व दुःख सर्व अडचणी तुमचे पितृ दूर करतील पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही. याशिवाय पितरांसाठी दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो.
या दिवसात दारावर कुणी पशु पक्षी, माणूस आले तर नक्की दान करावे, सेवा करावी, त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये, कारण पितर हे कोणत्याही रुपात येत असतात, आपण त्यांची आठवण काढतो की नाही ते पाहत असतात.
दिवाळीच्या खरेदीत नवीन तोरणं नक्कीच घरात आणली जातात, पण तोरण खरेदी करताना त्यात कोरडी पाने, फुले इत्यादींचा वापर केला जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. घराच्या मुख्य गेटवर नेहमी ताज्या फुलांचा हार किंवा फेस्टून ठेवा.
यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.दिवाळीपूर्वी बहुतेकांची घरे रंगवतात. घरामध्ये रंगरंगोटी किंवा रंगकाम करताना लक्षात ठेवा की रंग काळजीपूर्वक निवडा. मुख्य गेटजवळील खोलीला पांढरा, हिरवा किंवा गुलाबी रंग देणे शुभ मानले जाते.
दिवाणखान्याला पिवळा किंवा हिरवा रंग लावणे शुभ असते. स्वयंपाकघरात निळा, गुलाबी किंवा हिरवा रंग चांगला मानला जातो. यासोबत बेडरूममध्ये पिवळा आणि हिरवा रंगही घालू शकता.दिवाळीला प्रत्येक घरात रोषणाई असते.
लिंचिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवशी दिवे योग्य दिशेने लावावेत. घराच्या पूर्व दिशेला पिवळे, केशरी आणि लाल रंगाचे दिवे लावणे शुभ असते. तर पश्चिमेत गुलाबी आणि पिवळे रंग शुभ आहेत.
उत्तरेत पिवळा, निळा आणि हिरवा दिवा चांगला मानला जातो. यासोबतच दक्षिणेत पांढरा. पिवळा, लाल, जांभळा प्रकाश शुभ आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.