कावीळ 1 दिवसात बरी करणारा आयुर्वेदीक उपाय! नक्की करून पहा. निसर्गाचा चमत्कार आहे हा!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,कावीळ हा एक गंभीर आजार आहे. ज्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडतो. रक्तातील बिलीरुबिन या विषारी पदार्थाच्या वाढीमुळे हे घडते. काविळीवर उपचार करण्यासाठी अनेक औषधे आणि उपाय आहेत.

परंतु युनानी औषध पद्धतीमध्ये नमूद केलेल्या काही घरगुती उपायांद्वारेही तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.
रक्तातील बिलिरुबीनचं प्रमाण वाढलं, की डोळ्यांमध्ये पिवळेपणा येतो किंवा दिसतो, याला कावीळ असं म्हणतात. काही रुग्ण पांढरी कावीळ झाली आहे, असं सांगतात.

याचा अर्थ रक्ताच्या तपासणीत बहुतांशी हिपेटायटिस ‘बी’ निदर्शनास आला आहे, असा होतो. भारतामध्ये 0.5 टक्के लोकांमध्ये हिपेटायटिस ‘बी’चं इन्फेक्शन आढळून येतं.

अर्थात, यातील खूपच कमी लोकांच्या यकृतावर यामुळे परिणाम होतो. अशा रुग्णांबाबत हिपेटायटिस ‘बी’च्या पुढील तपासण्या करुन त्यावर उपाय करण्याची गरज आहे किंवा नाही, हे ठरवलं जातं.

व्हिटॅमिन ‘बी’ 12ची कमतरता, गिल्बर्ट सिंड्रोम आणि लाळ पेशीतील काही दोषांमध्ये यकृत ठणठणीत असतानादेखील डोळ्यांत पिवळेपणा दिसून येतो. कावीळीचं निदान करण्यासाठी लिव्हर फन्फशन टेस्ट ही प्राथमिक चाचणी केली जाते.

यामध्ये काही चाचण्या असतात. वरील तीन कारणांमध्ये फक्त बिलिरुबीनचं प्रमाण वाढलेलं असतं. बाकी सर्व घटक नियमित असतात. याचं महत्त्व असं, की तीन कारणांपैकी व्हिटॅमिन 12ची कमतरता असल्यास, ते दिल्यास बरे होतात.

गिल्बर्ट सिंड्रोम हा आजार नसून यामध्ये यकृतात बिलिरुबीनची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया मंदावलेली असते.

हिमोलिटिक आजारांमध्ये यकृतात दोष नसून रक्तातील लाल पेशींत दोष असतो. यावरील उपाय रक्त तज्ज्ञांकडे असतो. असे बरेच रुग्ण गैरसमजामुळे पथ्य पाळतात आणि नको ती औषधे घेत असतात.

व्हायरस, मद्य, औषधे, वन्य औषधे आणि इतर असंख्य कारणांमुळे यकृताच्या पेशींना अपाय होतो. अशा बाधित पेशी मरण पावतात. या मृत पेशींमधील काही घटक रक्तात जाऊन त्यांचं प्रमाण वाढतं.

असं झाल्यास बिलिरुबीन आणि एएलएटी, एएसटी हे सर्वच वाढलेले असतात. वर लिहिल्याप्रमाणे रुग्णास व्हिटॅमिन बी 12ची कमतरता,

लाल पेशींतील दोष किंवा गिल्बर्ट सिंड्रोममुळे कावीळ असेल, तर रक्तातील एएलएटी आणि एएसटीचं प्रमाण पूर्णपणे सामान्य असतं. फक्त बिलिरुबीन वाढलेलं आढळतं.

काविळीच्या आजारावर घरगुती उपाय म्हणून एक ग्लास टोमॅटोमध्ये मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून प्यायल्याने काविळ कमी होते. हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावं.

काविळीवर हा अतिशय असरदार असा घरगुती उपाय आहे. काविळीवर दुसरा सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणडे मुळ्याची पाने. मुळ्याच्या पानांचा रस काढून घ्यावा.

हा रस जवळपास दिवसभरात अर्धालीटर संपवावा. अवघ्या 10 दिवसांत काविळीची लागण झालेल्या रुग्णाला बरे वाटू शकते.

पपईची पाने हा तिसरा महत्वाचा उपाय काविळीवर रामबाण ठरतो. पपईच्या पानांची एक चमचा पेस्ट करून घ्या. या मिश्रणात एक चमचा हळद घाला.

दररोज एक ते दोन आठवडे हे मिश्रण घ्यावे. काविळीवर हा रामबाण उपाय ठरू शकतो. हा घरगुती उपाय अतिशय सहज करता येण्याजोगा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!