नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रोत्सव आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता नवरात्रोत्सवाचे केवळ दोन दिवस उरले आहेत. मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा उत्सव पार पडला. आता बाकी राहिली आहे ती अष्टमी आणि नवमी. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या अष्टमी आणि नवमीला मुलींना आमंत्रित केले जाते.
ज्याला कन्या पूजा असे देखील म्हटले जाते. मान्यतेनुसार मुलीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमी-नवमीला कन्यापूजन केले जाईल.
मात्र, यावेळी तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अष्टमी-नवमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे उपवास कसा सोडावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वैदिक कॅलेंडरनुसार, शारदीय नवरात्रीचा उत्सव दरवर्षी आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होतो आणि नवमी तिथीला समाप्त होतो. यंदा नवरात्री उत्सव गुरुवार, ३ ऑक्टोबरला सुरू झाला आणि आता तो ११ ऑक्टोबरला समाप्त होईल.
तर दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन १२ ऑक्टोबरला होणार आहे. पण यावेळी नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या तारखांवरून अनेकांच्या मनात बराच गोंधळ निर्माण झाला आहे.पंचांगानुसार,
या वर्षी शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३१ वाजता सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबरला रात्री १२.०७ वाजता समाप्त होईल. अष्टमी तिथी समाप्तीनंतर नवमी तिथी सुरू होईल.
नवमी तिथी ११ ऑक्टोबरला रात्री १२.०७ वाजता सुरू होईल आणि १२ ऑक्टोबरला सकाळी १०.५९ पर्यंत राहील.पंचांगानुसार, ज्यांना अष्टमी व्रत करायचे आहे, ते गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी उपवास करतील आणि ज्यांना नवमी तिथीचे व्रत करायचे आहे
ते शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी करतील.पंचांगानुसार, ११ ऑक्टोबर म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजेची वेळ सकाळी ६.२० ते सकाळी ९.१४ अशी आहे आणि ११ ऑक्टोबर रोजी म्हणजे नवमीचा अमृत मुहूर्त सकाळी ९.१४ ते १०.४१ पर्यंत आहे.
ज्यांनी महाअष्टमीची पूजा केली, त्यांनी शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी कन्यापूजा करावी आणि ज्यांनी नवमी तिथीची पूजा केली असेल, त्यांनी शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.५९ वाजण्यापूर्वी कन्यापूजा करावी.
कारण- त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल.नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी म्हणतात. याला महानिषाची रात्र, असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेच्या सर्वांत शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते.
या दिवशी माता दुर्गेच्या पूजेबरोबरच कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जी व्यक्ती या दिवशी कन्येची पूजा करते, त्याच्या घरात सुख-समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते.
महाअष्टमीला माता दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे.महानवमीला माता दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते.
सिद्धिदात्रीची पूजा केल्याने मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, असे मानले जाते. माता सिद्धिदात्रीची आराधना केल्याने मनुष्य रोग आणि भय यांपासून मुक्त होतो. महानवमीच्या दिवशी माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांना उपवासाचे फळ देते. त्यामुळे महानवमीला सर्वांत मोठे महत्त्व आहे, असे मानले जाते.
पंचांगानुसार, ११ ऑक्टोबर २०२ रोजी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी व्रत सोडण्याची वेळ आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ११ ऑक्टोबरला महागौरी आणि देवी सिद्धिदात्रीची पूजा देखील करु शकता.
या काळात अष्टमी तिथी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०६ पर्यंत आहे. त्यामुळे अष्टमीचे व्रत करणारे लोक या शुभ मुहूर्तावर उपवास सोडू शकतात. यानंतरची तिथी म्हणजे नवमी.
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या भाविकांनी कन्यापूजेनंतरच उपवास सोडावा. मातेला अर्पण केलेल्या अन्नाने व्रत सोडावे, अशी श्रद्धा आहे. यामुळे उपवासाचे पूर्ण फळ मिळते.
यावेळी कन्यापूजेसाठी प्रथम दुर्गा देवीची पूजा करावी. नंतर त्यांना हलवा पुरी अर्पण करा. त्यानंतर मुलींना पोटभर जेवू घालावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.