नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घरात आपल्या नेहमी सुख, समृद्धी आणि शांती समाधान असावे असे सर्वांना वाटते. यासाठी काहीजण नेहमीच प्रयत्नशील असतात. काही लोकांच्या घरी नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, त्यांच्या घरी शांत वाटते, समाधानी वाटते.
तर याउलट काही लोक तक्रार करतात, वाद घालतात, सतत त्वेष करतात व घरातील शांती भंग पावते. आशा घरी अलक्ष्मी वास करते व घरातील सर्व सदस्य नाराज होतात वास्तुदोष नकारात्मकता वाढते.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तांब्याचा सूर्य स्थापित करण्याचा विचार करत असाल तर रविवारी त्याची प्रतिष्ठापना करणे उत्तम मानले जाते. वास्तू तज्ज्ञांच्या मते, याशिवाय संक्रांतीसारख्या दिवशीही हे घरामध्ये लावले जाऊ शकते. तांब्याचा सूर्य लावूनही वर्षाची सुरुवात करता येते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर लावता येते. या दिशेने सूर्य लावणे खूप फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला घराच्या आत स्थापित करायचे असेल तर तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला स्थापित केला जाऊ शकतो.
हे घराच्या मुख्य दरवाजावर देखील टांगता येते.आर्थिक सुदृढता आणि स्थिरतेसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. तिजोरी, कपाट, सोने-चांदी, दागिने, आर्थिक कागदपत्रे इत्यादी वस्तू नैऋत्य दिशेला ठेवाव्यात.
ही दिशा पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते, जी स्थिरता सुनिश्चित करते. या दिशेने ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात. आर्थिक संबंधी वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका, याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.
घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच स्वच्छ आणि रिकामी असावी. ज्ञानाअभावी बहुतेक घरांमध्ये सोफे, टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात, जे योग्य नाही. ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धन-समृद्धी वाढते
आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच आरोग्यही प्राप्त होते.घरातील अग्नि, आकाश, वायू, पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे. म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच आग्नेय कोनात असावे.
तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. या ठिकाणी केशरी, लाल, गुलाबी रंग वापरावेत. तसेच, हे ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा. असे केल्याने धन-धान्य वाढते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते.पेंटिंगमुळे घरात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा येते.
वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेली चित्रे धन आणि प्रसिद्धी आकर्षित करतात. यासाठी तुमच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील भिंतीकडे धावणाऱ्या सात घोड्यांची पेंटिंग लावा. याशिवाय बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये तुम्ही ग्रीनरीशी संबंधित पेंटिंग्ज लावू शकता.
अशी चित्रे समृद्धी आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतात. घरातील अशी नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल जर तुम्ही हे उपाय तुमच्या घराच्या सुखासाठी कराल तर !
या वास्तू टिप्स तुम्हाला लाभदायी ठरतील. घरी तुम्ही रोज सकाळी उठल्यावर घरी स्वामींचे भजन , मंत्र लावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील, स्वामींचे रेडिओ मिळतात ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ असा मंत्रघोष होत असतो, ज्यामुळे आपले घर प्रसन्न राहते.
दुसरी गोष्ट म्हणजे घरातील अडगळ भंगार, कचरा घरात ठेवून घेऊ नका. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढत असते म्हणून अशा गोष्टी घरात ठेवून घेऊ नका. यानंतर घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील अशा प्रकारे घराची रचना
घरात भरपूर सूर्यप्रकाश, प्रत्येक खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश येईल बाल्कनीत नेहमी उजेड राहील, कोणत्याही प्रकारचा कोंदट प्रकारचे हवामान राहणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे आपले मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहते व आपला प्रत्येक दिवस आनंदात जातो.
घरात सकारात्मक ऊर्जा भरपूर वाढवा त्यासाठी घरात धर्म ग्रंथाचे वाचन नित्यपाठ, स्वामी सेवा, स्वामींचा जप, गायन, अभंग नेहमी गट रहा तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी पुस्तके घरी आणा ती वाचत रहा व त्यांचा संग्रह करून वेळोवेळी स्वच्छता करा.
शेवटची टीप म्हणजे घरात नेहमी सकारात्मक गाणी, अभंग लावा, सकारात्मकता निर्माण करणारे ओम चॅटिंग चे व्हिडिओ, तसेच बाकीची सुरेल, सुमधुर गाणी, नैसर्गिक संगीत जे तुमच्या मनाला उभारी देईल असे संगीत लावून ठेवा, घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने बोला,
प्रेमाने वागा घरात वाद होणार नाहीत, भांडण होणार नाही याची सतत काळजी घ्या. ज्यामुळे घरात शांतता नांदेल व सौख्य राहील व नात्यात गोडवाही राहील. अशा प्रकारे घरात सुख, समृद्धी शांती तुम्ही परत आणू शकता.
या टिप्स जर तुमच्या वास्तू मध्ये पालन केल्या तर स्वामी नेहमीच तुमच्यावर प्रसन्न राहतील, आयुष्यातील समस्यांना धीराने सामोरे जाल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.