नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आषाढी एकादशी : 1 रोप लावा चमत्कार बघा..
आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्यास काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात. याशिवाय आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी’ म्हटले जाते.
कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत असल्याची मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, अशी सांगितले जाते. यासह सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात. चातुर्मासात विवाहमुहूर्त नसतात.
काही दिवसातच चातुर्मास सुरू होईल. चातुर्मास ही 4 महिन्यांचे असल्याने या 4 महिन्यास आपण काही उपाय किंवा गोष्टी तसेच श्री स्वामीची सेवा केल्यास आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील.
त्यामुळे ही सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते.घरात पैसा,सुख-समृद्धी येते.आपण येत्या आषाढी एकादशी किंवा पौर्णिमा या दिवसापासून चातुर्मासाची सेवा सुरू करू शकतो.
ज्या महिलांना सोळा सोमवार व्रत करायचे असेल तर, त्यांनी आषाढी एकादशी किंवा गुरु पौर्णिमेपासून सोमवार व्रत सुरू करू शकता.याशिवाय कार्तिकी एकादशीला या सोमवार व्रताचे उद्यापन करू शकतो.
तसेच गुरुपौर्णिमाच्या आधी 7 दिवस गुरुचरित्र पारायण केल्यास,स्वामींची कृपादृष्टी राहण्यास मदत होईल.
यासह चातुर्मासच्या चार महिन्यात म्हणजे आषाढी एकादशीपासून घरातील सर्व सदस्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ आणि पूजा करावी.
तसेच या सगळ्या सदस्यांनी आपल्या घरातील कृष्ण, बाळकृष्ण याची पूर्ण श्रद्धेने पूजा करून ,त्यावर एक तुळशीचे पान अर्पण करावे.त्यामुळे बाळकृष्ण प्रसन्न होतात.
तसेच नियमितपणे रोज स्वामी समर्थची एक माळ जप करावा आणि कमीत कमी स्वामी चरित्र सारामृतचे 3 किंवा 1 तरी अध्याय वाचवा.हे वाचन 4 महिन्यापर्यंत आपण करावं.
याशिवाय चातुर्मासाची 4 महिन्यांमध्ये गणेशपुराण ,शिवलीलामृत ,स्वामीचरित्र, गुरुचरित्र ,भक्ती लीलामृत ,
हरिपाठ, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णुसहस्त्रनाम यापैकी कोणतेही पवित्र ग्रंथाचे 4 महिने वाचन करावे म्हणजे चार महिने स्वामींची सेवा आपण करत राहावे.
हे वाचन आपल्या इच्छेनुसार सकाळ किंवा संध्याकाळ करावे. याशिवाय ही 4 महिने मांसाहार करू नये आणि घरात जास्तीत जास्त साफसफाई करावी.यापैकी कोणतीही एक सेवा आपण येत्या चातुर्मासात करावी.त्यामुळे आपल्याला खूप लाभ होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.